ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ; हिवाळी अधिवेशनापूर्व 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. परंतु, अधिवेशनापूर्व कोरोना चाचणीत 17 जण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.

 

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळातील कर्मचारी, पोलीस आणि लोकप्रतिनिधींची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. एकूण 2500 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या 17 रुग्णांमध्ये पोलीस आणि कंत्राटी कामगारांचा समावेश आहे.

 

सुदैवाने अधिकारी, विधानभवन कर्मचारी यांचा समावेश नाही. तसंच  कोरोना चाचणी केलेल्या लोकप्रतिनिधींना  कोरोनाची लक्षण नसल्याचे समोर आले आहे.  मागील पावसाळी अधिवेशनात 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!