मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरून राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार करणार्या रेणू शर्मा विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
कृष्णा हेगडे हे रेणू शर्मा विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांकडे पोहोचले असल्याची माहिती समजत आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणारी महिला 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक आरोप हेगडे यांनी केला आहे. यामुळे धनंजय मुंडे प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला आपल्यालाही 2010 पासून ब्लॅकमेल करत असल्याचा धक्कादायक खूलासा कृष्णा हेगडे यांनी केला आहे. आपल्याला प्रसारमाध्यमांतील वृत्तावरुन सदर महिला धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करत असल्याचे समजले. यांनतर याबाबत सदर महिलेचा आपल्याला आलेला अनुभवही मुंबई पोलिसांना सांगावा या हेतुने हेगडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मी तुला भेटण्यात अजिबात रस नाही, मग तिच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.
दरम्यान, माझी ही भुमिका राजकिय नसून हा माझा वयैक्तिक निर्णय आहे. आता यानंतर अजून काही लोक सदर महिलेविरुद्ध तक्रार देण्यास समोर येतील अशी शक्यताही हेगडे यांनी व्यक्त केली आहे.