ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाहीतर महाराष्ट्रातील जनता माती केल्याशिवाय राहणार नाही ; सेनेचा भाजपवर टोला

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल सोमवारी जाहीर झाले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर आजच्या सामनातून संजय राऊतांनी जोरदार बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केलीय.

राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे? ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आजच्या सामनातून राऊतांनी जोरदार बॅटिंग करत तुफान फटकेबाजी केलीय. “ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे. विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे. ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ ना हाताशी धरुन महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडवता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला , हवा येऊ द्या!”, अशा शब्दात राऊतांनी टोलेबाजी करत भाजपला डिवचलं आहे.

“भाजपचे ग्रामपंचायतींचे निकाल हा राज्याच्या जनतेचा कौल आहे. ग्रामपंचायती म्हणजे गाव खेड्यातल्या, पाड्यावरच्या विधानसभाच आहेत. त्या निवडणुकीत राज्याची जनता मतदान करते. आजपर्यंतचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षाचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. विखे पाटील यांच्या ताब्यात 20 वर्षांपासून असलेली लोणी खुर्द ग्रामपंचायत त्यांनी गमावली आहे. रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, नीतेश राणे यांच्या घरातील ग्रामपंचायती भाजपने गमावल्या आहेत.” “कोकणात शिवसेनाच आहे, पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल. मात्र राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला लोकांनी स्वीकारले आहे. विरोधकांनी गेले वर्षभर ज्या बदनामी मोहिमा राबवल्या, सरकारच्या विरोधात जहरी प्रचार केला, त्याचा काहीच परिणाम झाला नाही.”असं ही शिवसेनेन म्हंटल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!