दिल्ली,दि.२६ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (रविवारी) आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. आत्तापर्यंत देशाच्या विविध मुद्द्यांना हात घालत त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे त्यांच्या मन की बात अशी चर्चा देशभर होत असते. या कार्यक्रमाचा 69 वा भाग आहे. आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरून हिंदी भाषेतील प्रसारणानंतर प्रादेशिक भाषांमधून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे.