ब्रिस्बेन : ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली. चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता. भारताचे अनुभवी गोलंदाज संघाबाहेर असताना युवा गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी पाठवला.
दिवस संपण्याआधी भारताला नव्या चेंडूवर विकेट घेता आली नाही. खेळ संपला तेव्हा कॅमरून ग्रीन २८ तर कर्णधार टीम पेन ३८ धावांवर नाबाद होते. भारताकडून नटराजनने सर्वाधिक दोन तर सिराज, ठाकूर आणि सुंदर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.