दिल्ली,दि.१५ : परतीच्या पावसाने देशाला तडाखा दिल्यानंतर आता हिवाळा देखील अधिक कडाक्याचा असेल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘ला निना’ या परिस्थितीमुळे अशी परिस्थिती येऊ शकते,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलेल्या वेबिनार कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहापत्रा यांनी याला दुजोरा दिला आहे. थंडीची लाट येण्यामागे अल निनो आणि
ला निना ही हवामान विषयक परिस्थिती प्रामुख्याने कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.देशात दरवर्षी उत्तर प्रदेश,बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीने मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडतात.आता इतर ठिकाणी तशी परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.