दिल्ली,दि.२४ : भारतासह संपूर्ण जगात कोरोनावरील लसीसाठी मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर देशी लसीच्या वैद्यकीय परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला काल सरकारने मंजुरी दिली आहे.
भारत बायोटेक कंपनीने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्याने ही लस तयार केली असून या लसीचा अंतिम टप्पा पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. कोवॅक्सिन असे या लसीचे नाव असून 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 28 हजार अधिक नागरिकांवर या लसीची चाचणी होणार आहे. महाराष्ट्रात मुंबईमध्ये या लसीची चाचणी होणार आहे तर यासाठी देशात एकूण दहा राज्यात 18 ठिकाणी हे परीक्षण होणार आहे.