पुणे | आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत संस्थेच्या सचिव कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिला आहे. त्यानंतर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक पार पडणार आहे. शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात पोहोचल्याचं बोललं जात आहे. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
दरम्यान पुण्यातील रयत शिक्षण संस्थेत गेली तीन वर्षे कार्यरत असलेल्या एका माजी सचिवाने अचानक राजीनामा दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्था पातळीवरील सर्वांचेच लक्ष लागले आहे. या बैठकीत शरद पवार आणि पदाधिकारी यांच्यात नेमकी काय चर्चा होणार. तसेच खासदार शरद पवार निर्णय काय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान रयत शिक्षण संस्थेचे सचिव कराळे गेल्या बऱ्याच वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेची निगडित आहेत.