ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवीन दर

मुंबई । आज देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल १७ ते १८ पैसे आणि डिझेल दरात २२ ते २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८७.९२ रुपये आणि डिझेल ७७.११ रुपये झाले आहे. तर राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ८१.२३ रुपये असून डिझेल ७०.६८ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.३१ रुपये असून डिझेल ७६.१७ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.७९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७४.२४ रुपये प्रती लीटर झाले आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी ४८ दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये पेट्रोलचे दर वाढले होते. 10 सप्टेंबरपर्यंत ते कायम राहिले आणि त्यानंतर पेट्रोलचे दर हळूहळू कमी झाले. मागील महिन्यापर्यंत जे 1 रुपया 19 पैसे होते. त्याचवेळी 25 जुलैला दिल्लीत डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 31 जुलै रोजी दिल्ली सरकारने त्यावर व्हॅट कमी केला, त्यानंतर ते प्रति लिटर 8.38 रुपयांनी स्वस्त झाले. त्यानंतर 3 ऑगस्टपासून त्याची किंमत एकतर कपात केली गेली किंवा ती स्थिर राहिली. यामुळे डिझेल 3.10 प्रति लिटर अधिक स्वस्त झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!