मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी मागील तीन आठवड्याहून अधिक काळ इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. देशात सलग २७ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव ‘जैसे थे’च आहे. मुंबईत पेट्रोल ९० रुपयांवर कायम आहे.
मुंबईत रविवारी एक लीटर पेट्रोलचा भाव ९०.३४ रुपये आहे. तर एक लीटर डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. बंगळुरात आज एक लीटर पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये असून डिझेलचा भाव ७८.३१ रुपये आहे.
देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी सलग्न आहेत. त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचा भाव निश्चित केला जातो. दरम्यान, जागतिक बाजारात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाच्या भावात किरकोळ वृद्धी दिसून आली होती. करोना लसीकरणाने वेग घेतला आहे. ज्यामुळे युरोपातील आर्थिक स्थिती सावरेल, अशा आशावाद बड्या गुंतवणूकदारांना वाटत आहे. परिणामी तेलाच्या भावात तेजी आहे.