ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः  भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेल च्या दरात वाढ केली आहे. मागील दोन दिवसापासून कोणतीही वाढ केलेली नव्हती मात्र आज वाढ केलीय. आज बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं वाढवले आहेत.  आहेत. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.49 रुपये झाला आहे. तर एक लिटर डिझेलचा भाव 72.65 रुपये झाला आहे.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

आजच्या दर वाढीनंतर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती वाढून क्रमश: 82.49 रुपये, 84.02 रुपये, 89.16 रुपये आणि 85.44 रुपये प्रतिलिटर वाढले आहेत. चार शहरांतील डिझेलच्या किमती वाढून क्रमश: 72.65 रुपये, 76.22 रुपये, 79.22 रुपये आणि 78.06 रुपये प्रतिलिटर झाल्या आहेत.

20 नोव्हेंबरनंतर वाहनांच्या इंधनाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. दोन आठवड्यांच्या दिलाशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. 13 दिवसांत पेट्रोल 1.46 रुपये प्रति लीटर महागले आहे. त्याचदरम्यान डिझेलचे दर 2.11 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत. 20 नोव्हेंबरपासून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तत्पूर्वी 22 सप्टेंबरपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर होते. तर डिझेलच्या किमतीत 2 ऑक्टोबरपासन कोणताही बदल झालेला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!