पोलीस अधिकारी,ठाणे अंमलदार आणि पोलीसांचा वाढदिवस आता पोलीस ठाण्यात साजरा होणार; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतला निर्णय
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२ : पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा
दिवस म्हणजे त्यांचा स्वतःचा वाढदिवस.तो वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्याबाबत परिपत्रक काढून त्यांना वाढदिवस दिवशी एक दिवस किरकोळ
रजा किंवा पर्यायी साप्ताहिक सुट्टी देण्याबाबतचे परिपत्रक पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढले आहे.
या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे कायदा व सुव्यवस्था व इतर बंदोबस्तामध्ये सतत व्यस्त असतात.त्यामुळे त्यांना आपले कुटुंबातील,नातेवाईक, मित्रमंडळी, यांच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजर राहता येत नाही.एवढेच नव्हे तर स्वतःचा वाढदिवस सुद्धा साजरा करता येत नाही याच बाबीचा विचार करून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपूते यांनी आपल्या स्वतःच्या सहीनिशी शुभेच्छा पत्रक काढले आहे.
या निर्णयानुसार पोलीस ठाणेकडील ‘वाढदिवस’असणाऱ्या पोलीस अंमलदार यांना वाढदिवस दिवशी पाठवून शुभेच्छापत्र उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या हस्ते देण्यात आले.वाढदिवस साजरा केलेले वाढदिवसाचे फोटो पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण यांचेकडे पाठवणे बाबत त्यांनी सूचना केली आहे. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कुटुंबप्रमुख या नात्याने कुटुंबातील सदस्यचा वाढदिवस साजरा करणे उपक्रमाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमाचे सर्व पोलीस बांधव यांच्याकडून कौतुक होत आहे.याच धर्तीवर अक्कलकोटमध्ये पोलीस अंमलदार गजानन शिंदे, अंबादास दुधभाते,महिला पोलीस अंमलदार शारदा हिप्परगी यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यामध्ये साजरा करण्यात आला.