पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते झाले युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण,संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कत्थक, भरतनाट्यम अन् मोहिनी अट्टम
सोलापूर,दि.२० : दुर्लभ सुंद्रीकला अकादेमीच्या वतीने सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत प्रतिभा महोत्सवात संद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम, मोहिनी अट्टम आदी विविध संगीाताची मेजवाणी ऐकण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली.
या प्रतिभा महोत्सवाचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजक भिमण्णा जाधव, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नंदीनी शिंदे, पत्रकार शिवाजी सुरवसे,झी युवा टीव्हीवरील परिक्षक व कथ्थक नृत्यकलाकार मयुर वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी बासरीवादक निनाद मुळगांवकर, कोलकत्याचे सितारवादक कल्याण मजूमदार, दिल्लीच्या प्रसिध्द नृत्यकलाकार मलाविका अजितकुमार, मुंबईच्या पूजा मोरे आणि सई कानडे, शास्त्रीय गायकक आदित्य खाडवे, बेळगावचे हार्मोनियमवादक सारंग कुलकर्णी, बेंगलूरच्या भरतनाट्य कलाकार अंजना शर्मा,पुण्याच्या वैष्णवी सुंदरम, सोनवी मेंहेंदळे, सानिका जोशी यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते युवा गंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये सोलापुरातील कलाकारांचे, सोलापूर नगरीचे कौतुक केले.सुंद्रीवादनाबद्दल भीमण्णा जाधव कुटूंबियांचे खूप कौतुक केले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी देखील सोलापूरचे कौतुक करीत ही कलावंत नगरी आहे. कलावंतांना श्रोत्यांनी मान दिला पाहिजे त्यांच्या कलेची कदर केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश पाटील यांनी केले. यावेळी भिमण्णा जाधव, रामेश्वर गुरव, गुरुनाथ जाधव, गोरखनाथ जाधव, संतोष कोथळीकर आदी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा संगीत महोत्सव सुरू आहे.
रविवारी समारोप
दोन दिवस आयोजित केलेल्या या संगीत महोत्सवाचा रविवारी समारोप होणार आहे. सकाळी नऊ वाजता व्यंकटेश माने, गुरुनाथ जाधव, ऋषीकेश बदामीकर, आदित्य खाडवे, अंजना शर्मा आदी विविध कलाकरांचा भरतनाट्यम, सामुहिक नृत्य, कत्थक , शास्त्रीय गायकन, सुंद्रीवादक कला प्रकार ऐकायला आणि पहायला मिळणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन भिमण्णा जाधव यांनी केले आहे.