सोलापूर,दि.१४ : अक्कलकोट तालुकयातील पान मंगरूळ येथील सध्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे कार्यरत असलेले अधिव्याख्याता प्रा. संदिप अप्पाराव पवार यांना नुकतेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे शिक्षणशास्त्र विषयात पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी A Study of the Co-curricular activities for Development of Social Skills among Students in Mentally Retarded Institutions in Maharashtra State ‘महाराष्ट्र राज्यातील मतिमंद संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कौशल्यांच्या विकासनासाठी सह-शालेय उपक्रमांचा अभ्यास’
या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी समावेशित शिक्षण क्षेत्रास उपयुक्त योगदान दिले आहे. याकरिता त्यांना शिक्षणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. पाटणकर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांना या कार्यात प्रा. डॉ. एम. एस. पद्मिनी, डॉ. सी. पी. सोनकांबळे, डॉ. व्ही. एस. खंडागळे आदींचे सहकार्य मिळाले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथील प्राचार्य डॉ. गजानन पाटील, सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता तथा अधिव्याख्याता यांचेही त्यांना वेळोवेळी सहकार्य मिळाले. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ते संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमधील संतोष पवार आणि दक्षिण कोरिया येथील संशोधक डॉ. सचिन पवार यांचे बंधू आहेत.