आज आम्ही तुम्हाला एका अशा बिजनेसबाबत सांगणार आहोत, ज्याला मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी आहे. हा बिजनेस आहे स्माॅल स्केल मध्ये टी शर्ट प्रिंटिंग
चा. प्रिंटेड टी शर्टची सध्या बाजारात खूप मागणी आहे. बर्थडे असो किंवा काही खास कार्यक्रम आजकाल लोक अनेकदा आपल्या मित्रांना आणि खास व्यक्तिंना याप्रकारचे गिफ्ट देणे पसंद करतात. याव्यतिरिक्त शाळा, कंपन्या आणि बिजनेस ऑर्गनायझेशन मध्ये अनेक संधी साधून कस्टमाइज्ड टी शर्ट प्रिंट करवून घेतले जातात. एकूण संधी पाहता या बिजनेसमध्ये अनेक ठिकाणांहून संधी उपलब्ध होतात. चला तर मग जाणून घेऊया या बिजनेस विषयी…
महत्वाची गोष्ट म्हणजे खूप कमी पैशात घरीच हा बिजनेस सुरू करता येऊ शकतो. केवळ 50 हजार ते 70 हजार रूपयांची गुंतवणूक करून टी शर्ट प्रिंटिंग बिजनेसची सुरूवात करू शकता. या बिजनेसमधून तुम्ही महिन्याला 30 ते 40 हजार रूपये कमवू शकता. याव्यतिरिक्त यात तुम्ही यश संपादन केल्यास गुंतवणूक वाढवून बिजनेस वाढवू शकता. यानंतर तुमची कमाई देखील वर्षाला लाखों रूपयांहून करोडो रूपयांपर्यंत पोहोचू शकते.
छोटा उद्योग मोठा नफा –
जानकारांच्या म्हणण्यानुसार, कपड्यांची एक सामान्य प्रिंटिंग मशीन 50 हजार रूपयांत येते. आणि याने काम सुरू केले जाऊ शकते. प्रिंटिंगसाठी घेतली जाणारी सामान्य क्वालिटी च्या एका व्हाईट शर्ट ची किंमत साधारण 120 रूपये आहे. आणि प्रिंटिंग काॅस्ट 1 ते 10 रूपयांपर्यंत येते. म्हणजेच 130 रूपयात तयार होणारे शर्ट तुम्ही 250 रूपये ते 350 रूपयांना विकू शकता. याप्रकारे एका टी शर्टवर तुम्ही 50 टक्के नफा कमवू शकता. या शर्टची विक्री तुम्ही स्वत:ही करू शकता.
ऑनलाईन विक्री करणे सोपे –
आजकाल सर्वचजण सोशल मिडियाचा वापर करतात. व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले तर सोशल मिडियाचा वापर करून तुमचा बिजनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकता. खूप कमी पैशांमध्ये अनेक लोकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचेल. एखाद्या ई काॅमर्स प्लॅटफाॅर्मवरूनही तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकता.
ऑटोमॅटिक मशीनद्वारे उत्पादन दुप्पट –
हळू हळू तुम्ही तुमचा बिजनेस वाढवू शकता. बिजनेस वाढल्यानंतर तुम्ही जास्त किंमतीच्या मशीनचाही वापर करू शकता. ज्यामुळे उत्पादनाची क्वालिटी आणि संख्याही वाढले. जास्तीत जास्ट शर्ट प्रिंटिंग करता येतील. स्वस्त मशीन मॅन्युअल असते. त्याद्वारे एक टि शर्ट प्रिंट करण्यासाठी साधारण 1 मिनिट वेळ लागतो. ही माहिती महत्वाची वाटल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा…