ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उध्दव-राज एकाच मंचावर

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५वी जयंती. या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज (२३ जानेवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर दिसणार आहेत.

बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा

हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच आणि १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!