नवी दिल्ली : देशात सध्या अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाचा आता रिपब्लिक टीव्हीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2021
रोहित पवार यांनी “कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!'” असं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं” असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे.