अक्कलकोट,दि.११ : अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथे ३३/ ११ के.व्ही.उपकेंद्र उभारणीला मान्यता मिळाली आहे.यामुळे सहा गावच्या विजेचा प्रश्न
मार्गी लागला आहे.किमान पाच हजार शेतकऱ्यांना यामुळे सुरळीत वीजपुरवठा होणार आहे,अशी माहिती आमदार सचिन कल्ल्याणशेट्टी यांनी दिली. भुरीकवठे, किरनळ्ळी, खैराट, गोगांव, वागदरी, घोळसगांव या सहा गावांना शिरवळ येथील ३३/११ के.व्ही. उपकेंद्रमधून विद्युत पुरवठा होत आहे. या उपकेंद्रावर कृषी व इतर ग्राहकांची संख्या वाढल्याने सुरळीत वीज पुरवठा होत नव्हता.तांत्रिक अडचणीमुळे विद्युत पुरवठा कमी दाबाने होणे, ओव्हर लोड लाईन ट्रिप होणे. त्यामुळे शेतीवरील मोटारी व डी.पी. वारंवार जळत होते. या सहा गावांतील शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवसच विद्युत पुरवठा करण्यात येत होता.भुरीकवठे येथे उपकेंद्र सुरु झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल व शेतीवरील मोटारी व डी.पी. (रोहित्र) जळण्याचे प्रमाण कमी होईल. मागील सहा वर्षापासून शेतकऱ्यांना प्रचंड त्रास होत होता. मुबलक पाणी उपलब्ध असूनही वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी पुरेसे देता येत नव्हते. पिकांची वाढ नीट न झाल्याने आर्थिक नुकसान होत होते.यामुळे या भागातील सर्व शेतकरी व सरपंच प्रदीप जगताप यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे नवीन उपकेंदासाठी मागणी केली होती.त्यानंतर आमदार कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यामुळे सदर विद्युत उपकेंद्रास मंजूरी मिळाली आहे.लवकरच या कामाला प्रत्यक्षात प्रारंभ होईल,असे त्यांनी
सांगितले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.