नवी दिल्ली । आज मराठा आरक्षणाप्रकरणी ५ न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. आता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात 8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. राज्य सरकारला युक्तिवादासाठी 4 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, तर विरोधी याचिकाकर्त्यांना 3 दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. केंद्र सरकार सुद्धा यावेळी आपली बाजू मांडणार आहे.
येत्या 8 मार्चपर्यंत कोर्टामध्ये प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली तर प्रत्यक्ष अथवा व्हर्च्युअल सुनावणी घेण्यात येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, आज देखील ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान अगदी थोडक्यात युक्तीवाद झाले.
घटनात्मक खंडपीठाकडून मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात 8 ते 18 मार्च दरम्यान सुनावणी होणार आहे. 8, 9 आणि 10 मार्चला याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. 12,15 आणि 16 मार्च सह 17 मार्चला या प्रकरणातील इतर बाजू ऐकून घेतल्या जातील. तर 18 मार्चला केंद्राच्या वतीने ॲटर्नी जनरल बाजू मांडणार आहेत. 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान मराठा आरक्षणावर सुनावणी होईल.