मुंबई | शरजील इस्मानीच्या हिंदूविरोधी वक्तव्यावरुन राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. शरजील उस्मानीनं केलेल्या वक्तव्यांनंतर भाजपनं त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली असून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनं शर्जिलला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणं याचा अर्थ यांचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. अटक केली जाईल म्हणजे कधी आम्ही मागणी केल्यावर. परिषदेला परवानगीच का दिली?,” असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.
शरजील उस्मानी याला पळवून लावण्यात आलं आहे. त्याला पळवून लावण्यास कोणी मदत केली. सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा हात आहे. एल्गारची पार्श्वभूमी माहीत असतानाही एल्गार परिषदेला परवानगी का देण्यात आली? असा सवाल करतानाच भाजपच्या आंदोलनानंतर सरकारला दोन दिवसाने जाग आली. त्यानंतर शरजीलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे तर शिवसेना ही अमिबालाही लाज वाटेल अशा पद्धतीने दिशाहीन झाल्याचंच हे लक्षण आहे, अशी टीकाही त्यांनी केली.