अक्कलकोट : महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजकारण बरोबरच राजकारणात उत्तुंग भरारी घेऊन गुरव समाजाचे अभिमान वाढविलेली ज्योती फुलारी यांचे अनुकरण समाजातील महिलाभगिनींनी करावा,असे आवाहन सोलापूर जिल्हा गुरव समाजचे अध्यक्षा वर्षाताई पाथरकर यांनी केले.
अक्कलकोट येथील मुरलीधर मंदिर मध्ये गुरव समाज महिला मंडळ हळदीकुंकू समारंभात उपस्थित राहून बोलत होत्या. कोरोनामुळे जवळपास एक -दीड वर्ष संपर्कात नसल्यामुळे महिला संपर्कात येतील आणि पुन्हा एकदा कोरोना विरुद्ध लढण्याची मानसिकता महिलांमध्ये तयार होईल ही कल्पना वैशाली गुरव यांना सुचली आणि आपल्या पत्नीच्या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी श्री स्वामीराव गुरव यांनी हळदीकुंकू समारंभाच्या कार्यक्रमाचे पहिले पाऊल उचलले. त्यांच्या या सामाजिक सत्कार्याला भौरम्मा विद्याधर गुरव , सुगलाबाई रमेश फुलारी , उज्वला प्रशांत गुरव यांनी साथ दिली आणि या चौघांनी स्वखर्चाने गुरव समाज महिला मंडळांचा भव्य स्वरूपातील हळदीकुंकू समारंभ आयोजित केला.
प्रारंभी स्वामिसमर्थ प्रतिमा पूजन तोळणूर ग्रामपंचायत सदस्य ज्योती फुलारी यांच्या हस्ते झाले. यावेळी शीलवंती बनजगोळे यांनी ईशस्तवन सादर केले. व्यासपीठावर जिल्हा महिला अध्यक्ष वर्षाताई पाथरकर , जिल्हा उपाध्यक्ष करुणाताई गुरव , अक्कलकोट तालुका महिला अध्यक्ष शिलवंती ताई बनजगोळे , उपाध्यक्ष रोहिणीताई फुलारी यांनी उपस्थित होते.
याचबरोबर या भव्य कार्यक्रमांमध्ये गुरव समाजाला अभिमान वाटावे असे महिला सक्षमीकरणाचं एक उत्तम उदाहरण म्हणून तोळणूर ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवडून नवनियुक्त सदस्या ज्योती मल्लिनाथ फुलारी आणि लायन्स क्लब अक्कलकोट रोटरी क्लब मध्ये चार्टर सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले स्वामीराव गुरव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास 70 महिलांनी कोव्हिड प्रतिबंध नियमाचे पालन करत उपस्थिती व उत्साह दर्शविला.
या वेळी ह.भ.प. काशिनाथ गुरव महाराज यांनी प्रत्येकांनी चांगले विचार , चांगले वर्तन , चांगले आचार चांगली वाणी ठेवून सुसंस्कारित व्हावे आणि पुढील पिढी सुसंस्कारित करावी व सुसंस्कारित पिढी घडवण्याचे आव्हान करत मार्गदर्शन केले. आणि याच बरोबर आपल्या कुटुंबासाठी वेळ देण्याचे आव्हान केले.
यानंतर विद्याधर गुरव यांनी स्त्री हीच घराचा आधार आहे , स्त्री हीच जगाचा उद्धार कर्ता आहे, स्त्रियांमध्ये असलेली प्रचंड शक्ती हीच स्त्रियांनी सत्कार्यासाठी लावावी असा महिलांचा सन्मान करत स्री शक्तीचा जयघोष केला.
या सुंदर भव्य अशा कार्यक्रमासाठी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यास चे कार्य योगिता पाटील यांनी केले , तर कार्यक्रमाचे सुंदर क्षणचित्रे टिपण्याचे कार्य रोहित फुलारी या बाल फोटोग्राफरने केले आणि तर आयोजकांना पर्यावरण पूरक बुके व पुस्तक देऊन प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा गुरव यांनी केले तर आभार भौरम्मा गुरव यांनी मानले.
प्रेम,आपुलकी ,जिव्हाळा रुपी संक्रांतीचे सौभाग्य वाण देऊन हळदीकुंकवाचा मान उपस्थित महिलांना देण्यात आला. कार्यक्रमाची सांगता उखाण्यांचा सरबराईत पार पडले. उपस्थित महिलांना अल्पोपहाराचे नियोजन हि आयोजकांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशीनाथ महाराज गुरव,प्रशांत गुरव,शिवानंद फुलारी ,विद्याधर गुरव,मल्लिनाथ पुजारी,आशोक आवटे,रमेश फुलारी ,स्वामीनाथ गुरव,उदय पाटील,प्रदीप गुरव, शरणप्पा फुलारी,अमोल फुलारी ,मल्लिनाथ फुलारी,अविनाश गुरव,चंद्रकांत गुरव,काशीनाथ बहाद्दूरे, काशिनाथ फुलारी,आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात मनीषा मेलगिरी,सावित्री गुरव,प्रभावती गुरव,महादेवी गुरव, सुवर्ण अवटी,अश्विनी फुलारी,तेजस्विनी बाद्दुरे,योगिता पाटील,सुनीता फुलारी,उमा गुरव,गीता गुरव,सोनाबाई गुरव, सोनाली गुरव, कविता गुरव,निर्मला फुलारी,.ज्योती फुलारी,शिलवंती फुलारी, सुमंगला पुजारी, जयश्री गुरव, गौराबाई गुरव, दिपाली आवटे, कविता फुलारी, ललिता बिराजदार,महादेवी बिराजदार,सविता बिराजदार,कविता फुलारी,सुजाता पाटील,अश्विनी,शारदा बिराजदार, गुरव ,अन्नपूर्णा गुरव,ललिता गुरव,ज्योती फुलारी,महादेवी फुलारी, जगदेवी फुलारी आदी सह मोठ्या संख्येत महिला भगिनी उपस्थित होते.