ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई मेट्रो कारशेड : मुंबई हायकोर्टाच्या स्थगितीनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई: कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. दरम्यान, यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही न्यायालयाच्या आदेशाची लिखीत सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्त्वाची आहे. यामुळं सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचणार आहेत तर, १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.


काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडी सरकारनं मेट्रो कारशेडसाठी आरे ऐवजी कांजूर येथील जागा निश्चित केली होती. मात्र, हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला. केंद्र सरकारनं ही जामीन केंद्राच्या मालकीची असल्याचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांच्या जमीन हस्तांतरणाच्या आदेशात त्रुटी असल्याचं नमूद केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!