ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी ; देशातील सर्व नागरिकांना मिळणार कोरोनाची मोफत लस

नवी दिल्ली : देशातील सर्व लोकांना कोरोनाची लस मोफत मिळणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. संपूर्ण देशात लसीकरणासाठी ड्राय रन सुरू असून देशात लसीकरणाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याचा आढावा केंद्रीय आरोगमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घेतला. त्यांनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोनाची लस मोफत मिळेल अशी माहिती दिली.

 

कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे लस आहे. लसीच्या निर्मितीवर काम सुरु असून लवकरच लसीकरण सुरु होणार आहे. याच दरम्यान लसीकरणावर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मोठे विधान केले असून संपूर्ण भारतीयांना कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा डॉ.हर्षवर्धन यांनी केली आहे.

 

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविडशिल्ड लसीला केंद्राने मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच लस दिली जाणार आहे. मात्र लसीची किंमत मोठी असेल अशी समज होती, सर्वसामान्य नागरिकांना ती परवडेल का?याबाबत शंका होती. मात्र आता संपूर्ण भारतीयांना कोरोनाची लस मोफत देण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी जाहीर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!