दिल्ली,दि.१० : देशात वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार देण्यात येतात.यंदाचा नोबेल पुरस्कार अमेरिकेतील ज्येष्ठ वैज्ञानिक हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राइस त्याशिवाय ब्रिटनचे वैज्ञानिक मायकल हॉगटन यांना जाहीर झाला आहे.नोबेल समितीचे अध्यक्ष थॉमस पर्लमन यांनी ही घोषणा केली.
हेपिटायटीस सी या व्हायरसचा शोध लावल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या वैज्ञानिकांनी आतापर्यंत अनेक विषयावर अभ्यासपूर्ण संशोधन केले असून त्यांची कामगिरी इतर वैज्ञानिकांच्या मानाने अतुलनीय मानली जात आहे.