ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यस्तरीय हिंदी अधिवेशन ‘गोवा’,30 हिंदी शिक्षकांची निवड

 

सोलापूर, दि.१७ : गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत राज्यस्तरीय हिंदी प्रचार व प्रसार संमेलनाचे आयोजन दिनांक 19, 20 व 21 फेब्रुवारी 2021 रोजी पणजी, मीरामार येथील हॉटेल सोलमार सभागृहात संपन्न होणार आहे.
गोवा येथील राज्यस्तरीय हिंदी प्रचार, प्रसार संमेलनासाठी सोलापूर जिल्ह्यातून हिंदी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 30 हिंदी विषय शिक्षकांना ‘भाषारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य समन्वयक श्री.सुरेश कोडग यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संपादक प्रभाकर ढगे, संमेलनाचे उद्घाटन गोव्याचे कला, सांस्कृतिक आणि सहकार व आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्तिथी गोव्याचे पूर्व मुख्यमंत्री रवी नाईक, पूर्व केंद्रीय कायदा मंत्री व गोव्याचे उपमुख्यमंत्री अॅड.रमाकांत खलफ, गोव्याचे पूर्व क्रीडा व कृषिमंत्री रमेश तवडकर, गोव्याचे शिक्षण संचालक भगीरथ शेटे हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गोवा हिंदी अकादमीचे अध्यक्ष सुनील शेट आहेत.
संमेलनामध्ये, चर्चासत्र, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण, हिंदी भाषेचे महत्त्व, ‘भाषारत्न’ पुरस्कार वितरण करण्यात येणार असून यावेळी काही महत्त्वपूर्ण ठराव ही मांडले जाणार आहेत. महाराष्ट्रातून 100 हिंदी विषय शिक्षकांची निवड या संमेलनासाठी करण्यात आली असल्याची माहिती राज्य संमेलनाचे मुख्य संयोजक कैलास जाधव आणि सुरेश कोडग यांनी माहिती दिली.
संमेलनाचे मुख्य संयोजक कैलास जाधव, राज्य समन्वयक सुरेश कोडग, सह समन्वयक उस्मान मुलाणी, संमेलन नियोजन प्रमुख एम. आय. तांबोळी, सह संयोजक राजूदास पवार, संमेलन नियंत्रक सुभाष खरबस, सोलापूर जिल्हा समन्वयक हरुन बंदुकवाले आदींनी या संमेलनासाठी नियोजन केले आहे.यात श्री कुमारेश्वर विद्यालय,शावळ (ता.अक्कलकोट)येथील हिंदी विषय शिक्षक धनंजय अभिमन्यू सुतार यांना भाषारत्न पुरस्कार जाहीर झाला
आहे. या पुरस्काराचे वितरण गोवा हिंदी अकादमी पुरस्कृत राज्यस्तरीय हिंदी प्रचार व प्रसार संमेलन, पणजी,
मीरामारयेथे होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. सुतार यांना यापूर्वीही अनेक तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.भाषारत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरांतून कौतुक होत
आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!