मुंबई, दि.२८: राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर आज कमी संख्येने नविन निदान झालेल्या रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आज दिवसभरात ११ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार ९३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७७.७१ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ६५ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६६ लाख २२ हजार ३८४ नमुन्यांपैकी १३ लाख ५१ हजार १५३ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात १९ लाख ७५ हजार ९२३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे