ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात उपचाराखालील कोरोना रुग्णसंख्येत घट कायम

 

मुंबई, दि.२९: राज्यात आज सलग दुसऱ्यांदा नविन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी नोंदविली गेली आहे. दिवसभरात १४ हजार ९७६ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आज ७८.२६ टक्के नोंद झाली आहे. आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या २ लाख ६० हजार ३६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६६ लाख ९८ हजार २४ नमुन्यांपैकी १३ लाख ६६ हजार १२९ नमुने पॉझिटिव्ह ( २०.४० टक्के) आले आहेत. राज्यात २१ लाख ३५ हजार ४९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २९ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६५ टक्के एवढा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!