अक्कलकोट : बेकारी हटवून म्हणणारे लोक बेकारी वाढवत आहेत, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणणाऱ्यांनी चौदा कोटी लोकांना बेरोजगार केले, असा आरोप माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला.
गुरुवारी,पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ टेनिस कोर्ट मैदान अक्कलकोट येथील आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
केंद्रातील भाजप सरकार हे फसवे आहे राज्यातील भाजपचे नेते तर त्याहून फसवे आहेत.सुरूवातीला दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असे आश्वासन विरोधकांनी दिले होते. आज सहा वर्ष झाले एका व्यक्तीला रोजगार मिळाला नाही.याउलट चौदा कोटी लोकांना बेरोजगार त्यांनी बनवले.फक्त थापा मारणे,दिशाभूल करणे हे त्यांचे काम आहे. त्यामुळे या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता महा विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनीही मार्गदर्शन केले.ते म्हणाले की, अनेक वर्ष चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व केले पण पदवीधरांसाठी काहीच केले नाही आता पुन्हा ते भाजपच्या माध्यमातून मत मागत आहेत
त्यांना यावेळी मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जातीयवादी शक्तीला कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ नका, विकासासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा,असे आवाहन केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे होते.
यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शलाका पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष भीमा कापसे,शिवसेना शहराध्यक्ष योगेश पवार, तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे,शहराध्यक्ष मनोज निकम,प्रथमेश म्हेत्रे,माया जाधव,मंगल पाटील,सुनीता हडलगी,शिवराज स्वामी, अरुण जाधव,प्रवीण घाटगे, वर्षा चव्हाण,स्वामींनाथ पोतदार, माणिक बिराजदार, अविराज सिद्धे,विजय माने, विशाल राठोड आदी उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आणि शहराध्यक्ष मनोज निकम यांनी केले.त्यानंतर २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मल्लिकार्जुन पाटील, संजय देशमुख,राज साळुंखे, शंकर व्हनमाने,तुकाराम दुपारगुडे,माणिक बिराजदार,वर्षा चव्हाण शमशोद्दीन शेख आदींनी मनोगत व्यक्त केले व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी तालुक्यात प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर भाष्य केले आणि शिक्षकांसाठी तातडीने कॅशलेस योजनेची अंमलबजावणी करावी,अशी मागणी केली.मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले.आभार माणिक बिराजदार यांनी मानले.या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.