ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोहित शर्माने आयपीएलच्या माध्यमातू कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

मुंबई  :  भारतीय संघाचा सलामीवीर आणि क्रिकेट जगतात हिटमॅन अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा आज अब्जावधी रुपये कमावतो.  रोहित शर्मानं आयपीएलच्या माध्यमातून 146.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या सीझनपासून आजपर्यंत रोहितच्या सॅलरीमध्ये तब्बल 500 टक्के वाढ झाली आहे.

 

रोहित शर्मा हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. रोहितच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सनं आजवर सर्वात जास्त पाच आयपीएल विजेतेपद पटकावले आहेत. आज ती जगातील सर्वात यशस्वी टीम आहे. रोहित शर्मानं त्याचा आयपीएलचा प्रवास डेक्कन चार्जर्सपासून सुरु केला. मुंबई इंडियन्सनं 2011 साली त्याला करारबद्ध केलं. तो 2013 साली त्या टीमचा कॅप्टन झाला. त्यानंतर तो आजवर मुंबईचा कॅप्टन आहे. रोहित शर्मानं आयपीएलच्या माध्यमातून 146.6 कोटी रुपयांची कमाई केली आहे.  आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) हा यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएल स्पर्धेतून 150 कोटींची कमाई करणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे.

 

रोहितची सॅलरी कशी वाढली?

रोहितला 2008 साली डेक्कन चार्जर्सनं 3 कोटींमध्ये खरेदी केलं होतं. तो 2010 पर्यंत डेक्कनसोबत होता. या काळात त्याची सॅलरी 3 कोटी होती. त्यानंतर 2011 मध्ये मुंबई इंडियन्सनं त्याला 9.2 कोटी रुपये मोजून करारबद्ध केलं. 2013 पर्यंत त्याची प्रति सीझन सॅलरी 9.2 कोटी होती. 2014 मध्ये रोहितची सॅलरी 12.5 कोटी झाली. IPL 2018 मध्ये मुंबई इंडियन्सनं रोहितला पुन्हा रिटेन केलं. त्यावेळी त्याच्या सॅलरीमध्ये आणखी वाढ झाली. रोहित 2018 पासून दरवर्षी आयपीएल स्पर्धेत 15 कोटी रुपये कमावतो.

 

रोहित शर्माचा रेकॉर्ड

रोहित शर्मानं आजवर 6 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यानं 2009 साली पहिल्यांदा डेक्कन चार्जर्सकडून विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली मुंबई इंडियन्स टीमकडून त्यानं आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!