ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोककला, पथनाट्य पथक ;निवडसूचीसाठी अर्ज करा 21 जानेवारीपर्यंत मुदत

  सोलापूर, दि.२ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने लोककला/पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. कला क्षेत्रातील अनुभवी संस्थांनी 21 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.

लोककला/पथनाट्य क्षेत्रासाठी गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरुपी, भारुड आदी क्षेत्रातील संस्था अर्ज करू शकतात. पथकाला विविध विषयावर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम/पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरुष, वादक यांचा समावेश असावा. लोककला/पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधान्य देण्यात येईल. संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.

          इच्छुक संस्थांना जिल्हा माहिती कार्यालयात अर्जाचा नमुना व माहितीपत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. संस्थांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन जिल्हा माहिती कार्यालय,

नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर-413001 येथे 21 जानेवारी 2021 पर्यंत जमा करावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!