ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा

सोलापूर : नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकमंगल परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लोकमंगल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच लोकमंगल वाचनालयाचे अध्यक्ष दिनकर देशमुख यांनी केली आहे. लवकरच या पुरस्कारांच्या वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

यासाठी लोकमंगल महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाचे साहित्य पुरस्कार ‘विजेने चोरलेले दिवस’ या सोलापुरातील संतोष जगताप यांच्या कादंबरीला जाहीर झाला आहे. तर ‘क्लोज एन्काऊंटर्स’ या पुरुषोत्तम बेर्डे यांच्या राजहंस प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ललित साहित्याला मिळाला आहे.  तर ‘सिनेमा पाहणारा माणूस’ अशोक राणे पुणे यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राला जाहीर झाला आहे. मुंबई येथील संधिकाल प्रकाशनने याचे प्रकाशन केले आहे.

25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर देऊन त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा यंदाचा लोकमंगल साहित्य पुरस्कार मराठी अभ्यास परिषदेच्या वतीने प्रकाशित केल्या जाणार्यां भाषा आणि जीवन या त्रैमासिकासाठी देण्यात येणार आहे. त्यांना 15 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीपासून सोलापूरच्या स्थानिक लेखकाला संधी मिळावी, यासाठी लोकमंगल परिवाराच्या वतीने नवोदित लेखक, कवीसाठी प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार असून तो पुरस्कार डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘कैवार’ या पुस्तकाला मिळाला आहे.

त्यांना 5 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर देऊन गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कार निवड समितीमध्ये शिरीष देखणे, राज काझी, नितीन वैद्य, डॉ. ऋचा कांबळे यांचा समावेश असून शोभा बोल्ली या समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. वरील पुरस्कारांची निवड या समितीने केली असून लवकरच या पुरस्कारांचा वितरण सोहळा सोलापुरात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याची माहिती शोभा बोल्ली यांनी दिली आहे. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिवा अनिता ढोबळे, श्यामकुमार भंडारी, फुगे आदी उपस्थित होते.

वडाळ्याच्या माळरानावर फुलली स्ट्रॉबेरीची शेती

वडाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या परिसरातील माळरानावर कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीची शेती करण्यात आली असून सोलापूरसारख्या उष्ण वातावरणात आणि खडकाळ जमिनीवरही उत्तम आणि पैसे कमवून देणार्या  स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येऊ शकते, हे या माध्यमातून दाखवून देण्यात आले आहेे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!