ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विठुमाऊलीचे दर्शन लांबले, माघी वारी रद्द – ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर : कोरोनाचे सावट अद्यापही संपले नाही. बरोबर कोरोनाची लस अनेकांना देणे बाकी आहे. यामुळे माघी यात्रा नियम व अटीनुसार होणार आहे. मात्र दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले आहे.

नवीन वर्षातील वारकरी संप्रदायाच्या पहिल्या यात्रेच्या मार्गातही कोरोनाचे काटे असल्याचं पाहायला मिळत होतं. लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यामुळं माघी यात्रेवरही अनिश्चिचिततेचे सावट होतं अखेर ही वारी रद्द करण्याचाच निर्णय घेण्यात आला.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे मागील साधारण वर्षभरापासून जगण्याचीच परिभाषा बदलली. वारकरी संप्रदारायासाठीही हे संपूर्ण वर्ष काही सोपं गेलं नाही. सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर 3 वर्षातून येणार अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सह. अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवार, सदस्य संभाजी शिंदे, हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर देशमुख, माधवी निगडे, शकुंतला नडगिरे, साधना भोसले यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

नव्या वर्षात म्हणजेच 2021 च्या सुरुवातीला येऊ घातलेली वारकरी संप्रदायाची पहिली यात्रा पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर 22 आणि 23 फेब्रुवारीला पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. चार प्रमुख वाऱ्यांपैकी एक असणाऱ्या माघ वारीच्याच वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंढरपूर मंदिर संस्थानचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याबाबतची माहिती दिली. शासनाने २८ फेब्रुवारी २०२१ तारखे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे परंपरेचे नियम होणार आहे. मंदिराच्या बाहेरचा विषयासंदर्भात शासन निर्णय घेईल. असे औसेकर महाराज यांनी सांगितले.

एका बाजूला कोरोनावरील लसीकरणाला देशभर सुरुवात झाली असताना अजूनही कोरोनाचे संकट संपले नसल्याने राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यातही लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यानच वारकरी संप्रदायाची माघी यात्रा 23 फेब्रुवारी रोजी होत असून कोरोनाच्या नियमानुसार कोणत्याही यात्रा जत्रा भरण्यास परवानगी नसल्याने या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!