ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश अकृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

 

सोलापूर, दि.१४ : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अकृषी विद्यापीठे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन संयुक्त सेवक कृती समितीच्या वतीने दिनांक 24 सप्टेंबर 2020 ते 1 ऑक्टोंबर 2020 पर्यंत लेखणी व अवजार बंद आंदोलन पुकारण्यात आला होता. त्या अनुषंगाने उदय सामंत मंत्री उच्च व तंत्र शिक्षण.मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 1 ऑक्टोबर 2020 रोजी 15 दिवसाच्या आत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मंत्रीमहोदयांनी दिलेल्या आश्वासनानंतर सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला असून त्याबद्दल माननीय मंत्री महोदयाचे कृती समितीच्या वतीने आभार मानण्यात येत आहे. तसेच सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी पुढील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्वर सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी आग्रही विनंती करण्यात आली.
याप्रसंगी कृती समिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील अध्यक्ष श्री गजानन काशीद, महासंघ उपाध्यक्ष श्री रविराज शिंदे,महासंघ प्रतिनिधी सोमनाथ सोनकांबळे, सुनील थोरात, उपाध्यक्ष नितीन मुंडफने, श्रीमती रुपाली हुंडेकरी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री आनंद पवार, प्रशांत पुजारी फोरमचे अध्यक्ष श्री प्रशांत चोरमले,सचिव जावेद खैरादी, मलिक रोकडे दिगंबर हराळे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष श्री मलकारसिद्ध हैनाळकर, सचिव सचिन चौधरी, चतुर्थश्रेणी संघटनेचे अध्यक्ष श्री वसंतराज सपकाळे उपाध्यक्ष श्रीमती सीता नवगिरे व संघटनेचे सरचिटणीस श्री. रविकांत हुक्कीरे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!