नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला आज संबोधित केले. कोरोनाकाळ आणि शेतकरी आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कोरोनाकाळात केलेल्या विरोधावरून विरोधी पक्षांना फटकारले आहे.
कोरोना संकट आलं तेव्हा जग भारतासाठी चिंतेत होतं. भारत स्वत:ला या संकटातून सावरेल की नाही, असं जगाला वाटत होतं. भारताने आल्या नागरिकांच्या रक्षणासाठी अज्ञात शत्रूशी लढा दिला. भारताने ही लढाई जिंकली म्हणून आज जगाला भारताचा अभिमान वाटत आहे. भारताने ही लढाई कोणत्याही सरकार किंवा व्यक्तीच्या विरोधातील लढाई जिंकली नाही. मात्र, तरीही याचं क्रेडीट भारताला जातं, असं मोदी म्हणाले.
कोरोना काळात वृद्ध महिलेने झोपडीच्या बाहेर दिवा लावला. तिची खिल्ली उडवली गेली. देशाचं मनोबल खच्चीकरण होईल, अशा गोष्टीत विरोधकांनी गुरफटून जाऊ नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
मोदींनी संसतदेत ऐकवली मैथिली शरण गुप्त यांची कविता
यावेळी त्यांनी प्रसिद्ध महाकवी मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेच्या ओळी ऐकवून भारतापुढे असलेल्या संधींचं वर्णन केलं. ‘अवसर तेरे लिए खड़ा है, फिर भी तू चुपचाप पड़ा है, तेरा कर्मक्षेत्र बडा है, पलपल है अनमोल, अरे भारत उठ, आँखे खोल’ मैथिली शरण गुप्त यांची ही कविता संसतदेत ऐकवली. त्यानंतर ते म्हणाले मैथिली शरण गुप्त आज असते तर त्यांनी हीच कविता वेगळ्या पद्धतीने लिहिली असती. त्यांनी ही कविता कशी लिहिली असती हे आपल्या शब्दात त्यांनी मांडलं.
मैथिली शरण गुप्त म्हणाले असते, ‘’अवसर तेरे लिए खडा है, तू आत्मविश्वास से भरा पडा है, हर बाधा, हर बंदीश को तोड, अरे भारत, आत्मनिर्भरता के पथ पर दौड“, अशी कविता मोदींनी सभागृहात म्हणताच सदस्यांनी डेस्क वाजवून त्यांचं स्वागत केलं.
#WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha to the Motion of Thanks on the President’s Address.(Source: Rajya Sabha TV) https://t.co/FkIpRmd9kN
— ANI (@ANI) February 8, 2021