ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विहारी-अश्विनची झुंजार खेळी ; ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ

सिडनी:  सिडनी क्रिकेट मैदानावर झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात भारतीय संघाने यश मिळवले.  ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334 धावाच करता आल्या.

हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन या जोडीने झुंजार खेळी केली. या दोघांनी मैदानात टिकून कांगारुंच्या भेदक माऱ्याचा सामना केला. विहारीने 161 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. तर रवीचंद्रन अश्विननेही 128 चेंडूत 39 धावांची खेळी केली.

टीम इंडियाकडून रिषभ पंतने सर्वाधिक 97 धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने झुंजार 77 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड आणि नॅथन लायनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर पॅट कमिन्सने 1 विकेट मिळवला. टीम इंडियाला विजयाची नामी संधी होती. मात्र रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा बाद झाले. यानंतर सामना ड्रॉच्या दिशेने गेला.

सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाच विकेट तर भारताला १३७ धावांची गरज होती. अशात विहारीला दुखापत झाली. विराहीला वेगाने धावा काढता येत नसल्याने या दोन्ही फलंदाजांनी बचाव तंत्र वापरले. भारताला ३० षटकात विजयासाठी ११८ धावांची गरज होती. पण फलंदाजी करणारे हे अखेरची फलंदाज असल्याने भारताने विजया पेक्षा सामना वाचवण्याकडे भर दिला. या दोघांनी साडेतीन तास आणि २५० हून अधिक चेंडू खेळले आणि सामना वाचवला. भारताने दुसऱ्या डावात ५ बाद ३२४ धावा केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!