ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शाळा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची अमरावती येथे माहिती

 

अमरावती,दि.१० : कोरोनामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद पण शिक्षण चालू हे धोरण सरकारने अवलंबले आहे.ही स्थिती पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग दिवाळीनंतर सुरू करण्याचा विचार असल्याचे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
ते काल अमरावती येथे बोलत होते.या शाळा सुरू करत असताना सरकारच्यावतीने एक नियमावली तयार करण्यात येत असून या माध्यमातून सर्वजण कोरोना पासून दूर कसे राहतील, याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. दरम्यान कोरोना काळातील सरकारने दिलेल्या सर्व नियम आणि अटी ठेवूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे, असं देखील ते यावेळी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!