ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ३० खेळाडूं परत करणार पुरस्कार

नवी दिल्ली: केंद्रातील सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे.  या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे आले आहेत. त्यांनी पुरस्कार वापसी मोहीम हाती घेतली आहे. हे खेळाडू आज हा पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहे. या 30 खेलाडूंमध्ये गुरमैल सिंह, हरमिंदर सिंह, वेटलिफ्टिंग कोच पाल सिंह, करतार सिंह यांचा समावश आहे. हे खेळाडू त्यांना मिळालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करणार आहेत.

केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. शेतकरी आंदोलनाचा आजचा 12 दिवस आहे.

 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित जवळपास 30 खेळाडू आज हा पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहेत. हे खेळाडू दुपारी अडीच वाजता प्रेस क्लब गाठून राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना होतील.

या 30 खेलाडूंमध्ये गुरमैल सिंह, हरमिंदर सिंह, वेटलिफ्टिंग कोच पाल सिंह, करतार सिंह यांचा समावश आहे. हे खेळाडू त्यांना मिळालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!