ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेरे येथील युवा शेतकऱ्याने घेतले 80 गुंठ्यात तब्बल 211 टन ऊसाचे उत्पादन

कराड ।  कृष्णा कारखान्याचा सभासद असणाऱ्या शेरे (ता. कराड) येथील पांडुरंग काकासाहेब निकम या युवा शेतकऱ्याने  युवा शेतकऱ्याने जयवंत आदर्श कृषी योजनेच्या माध्यमातून 80 गुंठ्यात तब्बल 211 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.  त्याच्या या ऊसक्षेत्राला चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी प्रत्यक्ष भेट देऊन, त्याच्या कार्याचे कौतुक केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, या उद्देशाने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने जयवंत आदर्श कृषी योजना सुरू केली. या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून प्रतिएकरी 100 टन उत्पादन घेण्याचा संकल्प करण्यात आला असून, गेल्या 4 वर्षात या योजनेत 9 हजार 499 शेतकरी सभासदांनी सहभाग घेतला.

शेंरे येथील पांडुरंग निकम यांनी देखील या योजनेत सहभागी होत, आपल्या क्षेत्रात ऊसाची लागवड केली. पण 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे त्यांचे ऊसक्षेत्र काही काळ पुराच्या पाण्यात होते. त्यामुळे लावलेल्या ऊसाचे पुढे काय होईल, या एकाच भितीने ते त्रस्त होते. पण योजनेतील सहभागामुळे कारखान्यातील अधिकाऱ्यांनी पूर ओसरल्यानंतर निकम यांच्या ऊसपीकाची विविध अवस्थेतील निरीक्षणे केले. तसेच ऊसविकास विभागातील सर्कल ऑफिसर व शेती मदतनीस यांच्यामार्फत त्यांना वेळोवेळी बांधावर जाऊन मार्गदर्शन करत, कारखान्यामार्फत विविध सुविधा पुरविण्यात आल्या. याचाच परिपाक म्हणून पांडुरंग निकम यांनी प्रतिएकरी 105 मेट्रीक टनाहून अधिक ऊस उत्पादन घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!