ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संजय राऊतांवर न्यायालयीन कारवाईची मागणी

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. पंजाबमध्ये एका शिख संतांनी आत्महत्या केली आहे. पण महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलंय.

दरम्यान, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हणत संजय राऊतांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘कांजुरमार्ग जमीन वाद – राऊत म्हणतात, मोठं षडयंत्र!… न्यायालयाच्या निर्णयाला षड्यंत्र म्हणणे हा न्यायालयाचा अपमान (contempt of court) असून याविरुद्ध संजय राऊत यांच्यावर कारवाई व्हावी…’ यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!