ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सवाल

मुंबई : भारताचा माजी  क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केलेले ट्विट आता चांगलेच महाग पडू शकते, असे दिसत आहे. कारण आता सचिनच्या घराबाहेर एका शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या युवा कार्यकर्त्याने आंदोलन सुरु केले आहे. तसेच आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील? असा सवाल या युवा कार्यकर्त्याने सचिन तेंडुलकरला केला आहे.  या पोस्टरबाजीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

गेल्या दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी पाठिंबा दर्शवत ट्विट केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्विट करत अप्रत्यक्षपणे रिहानावर टीका केली आणि सरकारचे समर्थन केल्याचे समोर आल्याने, सचिनबद्दल विविध प्रतिक्रिया समोर आहेत. सचिन तेंडुलकरने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यापूर्वी भूमिका का घेतली नाही, असा सवाल शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असणाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!