ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्वसामान्यांना झटका, बजेटनंतर LPG गॅस सिलिंडर महागला ; तपासा नवे दर

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसला आहे.  देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 4 फेब्रुवारी रोजी एलपीजी गॅसच्या किंमतीत वाढ केली आहे.इंडेनने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. या महागलेल्या किंमतीमुळे ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. गॅस सबसिडी नसणाऱ्या एलपीजीची किंमत मुंबई आणि दिल्लीमध्ये 25 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. तर कमर्शिअल गॅसच्या किंमतीत 6 रुपयांची घट करण्यात आली आहे.

असे आहे नवे दर

14.2 किलोच्या एलपीजी गॅसची किंमत 694 रुपये होती, या वाढीनंतर आता सबसिडी नसणाऱ्या या एलपीजी गॅसची किंमत 719 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमती बदलतात. पण या महिन्यात 1 फेब्रुवारी रोजी बजेट असल्याने त्या दिवशी किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. जानेवारी महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. मात्र फेब्रुवारीमध्ये एवढ्या मोठ्या फरकाने किंमती वाढल्याने ग्राहकांसाठी हा झटका मानला जात आहे. जानेवारीमध्ये कमर्शिअल गॅसच्या किंमती वाढल्या होत्या.

तुमच्या शहरात 14.2 किलोग्रॅम सिलेंडरचे काय आहेत दर?

नवी दिल्ली- 719 रुपये

मुंबई- 719 रुपये

चेन्नई- 735 रुपये

कोलकाता- 745.50 रुपये

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार 19 किलोच्या कमर्शअल गॅसच्या किंमती आज 4 फेब्रुवारी 2021 रोजी पुढील प्रमाणे आहेत

नवी दिल्ली- 1533 रुपये

मुंबई- 1482.50 रुपये

चेन्नई- 1649 रुपये

कोलकाता- 1598.50  रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!