नवी दिल्ली : सध्या WhatsAppवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 1 डिसेंबरपासून रेल्वे, कोविड-19 विशेष रेल्वेगाड्यांसह सर्वच रेल्वे गाड्या बंद करणार असल्याचे म्हटले गेले आहे. परंतु हा मेसेज खोटा, फेक असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकारी संस्था पीआयबीने या व्हायरल मेसेजच्या सत्यतेची पडताळणी केली असून याबाबत खुलासा केला आहे. 1 डिसेंबरनंतर ट्रेन सेवा बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असं PIBFactCheck ने या व्हायरल मेसेजच्या सत्यता पडताळणीत म्हटलं आहे.
रेल्वे, कोविड-19 (COVID-19) स्पेशल ट्रेनसह, सर्व ट्रेन 1 डिसेंबरनंतर बंद करणार असल्याचा मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे. परंतु रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सध्या सरकारची अशाप्रकारची कोणतीही योजना नसल्याचं सांगत रेल्वेने हा मेसेज संपूर्ण फेक असल्याचंही रेल्वेने म्हटलं आहे.
It is claimed in a #WhatsApp forward that all trains including the #COVID19 special trains will stop operating after 1st December. #PIBFactCheck: This claim is #Fake. @RailMinIndia has taken no such decision on halting of train services after 1st December. pic.twitter.com/3ZeGyCEaOw
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 23, 2020
आपल्यालाही अशा प्रकारच्या एखाद्या मेसेजवर शंका आली, तर आपणही तो मेसेज पीआयबी फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ अथवा व्हाट्सअॅप क्रमांक +918799711259 अथवा ईमेल – [email protected]वर पाठवू शकता. ही माहिती पीआयबीची वेबसाईट https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.