मुंबई : सलग आठवडाभर केलेल्या दरवाढीने बहुतांश शहरात पेट्रोल ९० च्या पुढे गेले होते.इंधन दरवाढीनंतर केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यांनतर कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज गुरुवारी देशात पेट्रोल आणि डिझेल दर स्थिर आहेत.
आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे.
दरम्यान, जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढल्याने किमतीत घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ४९.३८ डॉलर झाला आहे. तर वेस्ट टेक्ससमध्ये कच्चे तेल ४६.०५ डॉलर प्रती बॅरल आहे.