नवी दिल्ली । मागील गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले इंधन दर वाढ सुरूच आहे. या इंधन दर वाढीने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. आज गुरुवारी पेट्रोलची किंमत 17 पैशांनी तर डिझेची किंमत 19 पैशांनी वाढली आहे. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा भाव 82.66 रुपये झाला आहे. तर एक लिटर डिझेलचा भाव 72.84 रुपये झाला आहे.
20 नोव्हेंबरनंतर वाहनांच्या इंधनाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. दोन आठवड्यांच्या दिलाशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. 14 दिवसांत पेट्रोल 1.63 रुपये प्रति लीटर महागले आहे. त्याचदरम्यान डिझेलचे दर 2.30 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत. 20 नोव्हेंबरपासून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तत्पूर्वी 22 सप्टेंबरपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर होते. तर डिझेलच्या किमतीत 2 ऑक्टोबरपासन कोणताही बदल झालेला नव्हता.
चार शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे भाव
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती वाढून क्रमश: 82.66 रुपये, 84.18 रुपये, 89.33 रुपये आणि 85.59 रुपये प्रतिलिटर वाढले आहेत. चार शहरांतील डिझेलच्या किमती वाढून क्रमश: 72.84 रुपये, 76.61 रुपये, 79.42 रुपये आणि 78.24 रुपये प्रतिलिटर झाल्या आहेत.