ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ ; जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी आज बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने सध्या सोने आणि चांदीला मागणी आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९२४७ रुपये आहे. त्यात २०२ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी आज बाजार उघडताच सोने ३६५ रुपयांनी वाढले होते. सोन्याचा भाव ४९४१० रुपयांवर गेला होता. मंगळवारी देखील सोन्याचा दरात तेजी दिसून आली मात्र बाजार बंद होताना तो २६१ रुपयांच्या घसरणीसह ४९३४१ रुपयांवर स्थिरावला होता.

दरम्यान, चांदीच्या किमतीवर आज दबाव दिसून आला. एक किलो चांदीचा भाव ६५८३० रुपये असून त्यात ६५ रुपयांची घसरण झाली आहे. सकाळी सोन्याबरोबरच चांदीमध्ये तेजी दिसून आली. चांदीचा भाव ३४२ रुपयांनी वधारला होता आणि तो ६६२७९ रुपयावर गेला.

good returns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४६० रुपये झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत त्यात १२० रुपयांची घसरण झाली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९४६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२७५० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६७७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५१०२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८९९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५१६९० रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!