ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सांगलीतून पंढरपुरात आणलेले भेसळयुक्त १८८० लि. दूध नष्ट

पंढरपूर : सांगली जिल्ह्यामधून भेसळ केलेले व पंढरपूरात घेऊन येणार्याच टेम्पोमधील दूध पकडून ते नष्ट करण्याची कारवाई अन्न व औषध विभागाने केली. पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी केली. दरम्यान, हे दूध स्वीकारणार्याल साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर लि. या पेढीच्या व्यवसायावरही बंदी घातली असून तसे आदेश कुचेकर यांनी काढले आहेत. यामुळे भेसळयुक्त दुधाचा अवैध व्यवसाय करणार्यांलचे धाबे दणाणले आहेत.

 

सांगली जिल्ह्यातून निळ्या रंगाच्या टेम्पोतून भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती. या माहिती नुसार सांगली जिल्ह्यातून टेम्पो एम एच 09 सी यू 0007 या टेम्पोची  कुचेकर यांनी तपासणी केली असता हे दूध भेसळयुक्त असल्याचे उघड झाले. त्यानुसार टेम्पोतील 1880 लिटर दूध नष्ट केले. तसेच भेसळ केलेले दूध स्वीकारणार्याा साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर लि. या पेढीच्या व्यवसायावरही बंदी घातली असून तसे आदेश अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी काढल्याचे सांगितले.

 

दरम्यान, साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली. या पेढीची तपासणी केली. या पेढीत भेसळीचे दूध  तसेच उपलब्ध साधनसामुग्री व तज्ञ अधिकारी नसल्याचे दिसून आले. परिणामी कुचेकरी यांनी त्यांच्या व्यवसायावर बंदी घातली. यामुळे भेसळयुक्त दूधाचा व्यवसाय करणार्यांाचे धाबे दणाणले आहेत. शहरातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, संशयित भेसळीच्या दोन्ही दुधाचे नमुने विश्लेषणाकरिता ताब्यात घेण्यात आले. त्यानतंर उर्वरित साठा जन आरोग्याचा विचार करिता जागेवर नष्ट करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!