नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीवर लस सापडल्याने त्यातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे, त्याचवेळी करोना पेक्षा वेगाने पसरणाऱ्या आणि ईबोलो पेक्षा धोकादायक अशा नव्या विषाणूचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
ईबोलो विषाणूचा शोध ज्यांनी लावला त्या संशोधकांनीच हा इशारा दिला आहे. त्यांनी या विषाणूंचे नाव डिसिस एक्स ठेवले आहे. ईबोलो विषाणूचा शोध 1976 मध्ये प्रा. जीन-जॅक्स मुव्हेंबे तांफुम यांनी लावला होता. आफ्रिकेतील घनदाट जंगलात या विषाणूचे अस्तित्व आहे.
हा विषाणू करोना पेक्षा वेगाने पसरून आपत्ती येण्याची शक्यता आहे. यापुढे जाऊन जीन जेकस इशारा देतात की आता पशु आणि पक्षी द्वारे मानवात पसरणाऱ्या साथीचा धोका अधिक आहे.अशा स्वरूपाचा पहिला बाधित कोंगो देशात सापडला आहे.
याची लक्षणे म्हणजे ताप आणि रक्तस्त्राव. त्याची ईबोलो चाचणी घेण्यात आली. पण ती निगेटिव्ह आली. त्यामुळे डॉक्टरांना या आजाराचा हा पहिलाच बाधित असण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे आपत्ती येण्याची भीती व्यक्त होत असून मानवात हा आजार पशु पक्षांकडून आला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे.