नवी दिल्ली | – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.
केंद्र सरकारने आज साज जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो अॅबे, दिवंगत गायक एस.पी.बालसुब्रमण्यम, डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे, दिवंगत डॉ. नरिंदरसिंग कपानी, मौलाना वहिउद्दीन खान, पुरातत्वज्ञ बी.बी.लाल, वालूशिल्पकार सुदर्शन साहू यांचा समावेश आहे.
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.