ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोनारीच्या श्री काळभैरवनाथाची यात्रा उत्सव रद्द !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीकडून यात्रा रद्द करण्याचा निर्णय

सोलापूर : दरवर्षी कार्तिक वद्य आष्टमीला साजरी होणारी श्री काळभैरवनाथाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. परांडा तालूक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवरनाथाचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी हजारो भाविक येत असतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्टने या वर्षीचा जयंती उत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे भाविकांनी 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या जंयती उत्सवाच्या दिवशी दर्शनासाठी येऊ नये असे आवाहन ट्रस्टचे चंद्रकांत पूजारी यांनी केले आहे.

कोरोना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे त्यामुळे देवस्थानात गर्दी होऊ नये यासाठी श्री काळभैरवनाथ ट्रस्टच्या वतीने यात्रा काळातील सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 डिसेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव या आहे. या उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रा काळात होणारे किर्तनाचे कार्यक्रम, महाप्रसाद, पंचखाज वाटप रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे 7 डिसेंबर रोजी होत असलेल्या जंयती उत्सवाच्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये आवाहन श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

7 डिसेबर सोमवार रोजी श्री काळभैरवनाथाचा जयंती उत्सव आहे. सोमवारी भाविकांनी घरीच राहून श्री काळभैरवनाथ यांच्या मुर्ती – प्रतिमेची पूजा करून रात्री 12 वाजता श्रीची आरती करून गूलाल व फूले उधळावीत आणि गोड नैवैद्य दाखवून प्रसाद घ्यावा असेही देवस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यांच्या दर्शऩासाठी उस्मानाबाद जिल्ह्यासह सोलापूर, लातूर सह आजूबाजूच्या परिसरातून तसेच पर राज्यातून देखील हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता भाविकांनी स्वतःची कुटूंबाची तसेच समाजाची देखील काळजी घेण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात भाविकांनी देवस्थानाला सहकार्य करावे असे आवाहन देवस्थानचे मुख्य संजय महाराज पूजारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!