नवी दिल्ली : बजेटमध्ये आयात शुल्क कपातीची घोषणा झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्यात २७३ रुपयांची घसरण झाली आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजममध्ये सोन्याचा भाव ४७५०३ रुपये असून त्यात ३१३ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६७८८४ रुपयांची घसरण झाली असून ६८१ रुपयांची घसरण झाली.
good returns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८०१० रुपये झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९०१० रुपये झाला आहे. पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८०१० रुपये असून २४ कॅरेटसाठी ४९०१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८९० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५११५० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४९७० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४९०६० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८०६० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०७६० रुपये आहे.